Gokhale Institute of Politics and Economics

DSpace@GIPE
Not a member yet
    33335 research outputs found

    Assessing Nutrition and Forecasting New Type of Vulnerabilities in Jharkhand using National Family Health Survey- 4

    No full text

    नव्या चौकटींच्या शोधात शेती-विकास: स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारतीय शेतकी धोरणांचे लक्ष नेहमीच अन्नधान्य सुरक्षिततेवर तसेच ग्राहकांच्या हितावर केंद्रित झालेले आहे.

    No full text
    स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारतीय शेतकी धोरणांचे लक्ष नेहमीच अन्नधान्य सुरक्षिततेवर तसेच ग्राहकांच्या हितावर केंद्रित झालेले आहे. त्यामुळेच शेतमालाचा बाजार आणि किमती वर्षांनुवर्षे नियंत्रणाखाली राहिल्या आहेत. बाजारभाव वाढू लागले की विविध उपाययोजनांद्वारे शेतमालाच्या किमती नियंत्रित करून ग्राहकाचे हित जपण्याचे धोरण कायमच अवलंबिले गेले. विविध अभ्यास असे दर्शवितात की अशा धोरणांमुळे शेतकऱ्याला मिळणाऱ्या किमती अनेक वर्षे दबलेल्या राहिल्या. उत्पादन वाढत गेले तरी शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न अथवा नफा वाढून शेतीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण होऊ शकले नाही. तीन कृषी कायदे हे अनेकांना आशादायी वाटले ते यामुळे. ते मागे घेण्यात आल्यानंतरही, शेती हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने राज्याराज्यांत त्यावर फेरविचार होऊ शकतो. आणखी एक मुद्दा असा की शेतीसाठी पूरक म्हणजे सिंचन, दळणवळणाची साधने, माल साठवणुकीची गोदामे यांत सरकारी गुंतवणूक वाढली की खासगी गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळते. परंतु सार्वजनिक गुंतवणुकीत अनेक वर्षे पुरेशी वाढ न झाल्याने त्याचा विपरीत परिणाम खासगी गुंतवणुकीवर झाला. सरकारी पातळीवरून खते, बियाणे, वीज, पाणी यासाठी अनुदाने दिली गेल्याचे दिसून येते. परंतु अशी धोरणे अथवा सरकारी खर्चाचे शेतकऱ्यांचे उत्पन्न, नफा, गुंतवणूक यावरील परिणाम अल्पकालीन असतात. तसेच अनुदाने दिल्यामुळे स्वस्त असलेल्या खतांचा आणि पाण्याचा अतिवापर होऊन त्यामुळे जमिनीचे नुकसान होते असेच विविध अभ्यास सांगतात. भरमसाट अनुदानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्यास मर्यादा आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी पातळीवरून जाहीर होणाऱ्या हमी भावाच्या किमती हळूहळू वाढत आहेत. बाजारभाव हमी भावाखाली कोसळल्यास सरकार हमी भावाला शेतमाल विकत घेणार हे आश्वासन या हमी भावांतून मिळत असते. परंतु हमी भावाच्या सरकारी पातळीवरून केलेल्या वाढीलाही मर्यादा आहेत. तसेच हमी भाव जाहीर केले तरी त्या भावाला शेतमालाची खरेदी करण्यासाठी जर सरकारी यंत्रणा तयार नसेल ( उदा. गोदामे उपलब्ध नसतील) तर शेतकऱ्याचा माल हमी भावाला विकला जाणे अवघड बनते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हमी भावाखेरीज इतर अनेक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कायद्याची चौकट आणि भारतीय शेती स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या शेतजमीन मालकीसंदर्भातील सुधारणा आणि त्याअंतर्गत संमत झालेले कायदे यांचा प्रमुख उद्देश अतिरिक्त शेतजमिनीचे शेतमजूर/ अल्पभूधारक शेतकरी यांना वाटप करणे आणि शिवाय प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी जमीन भाडय़ाने देण्यावर बंदी/ निर्बंध आणणे हा होता. त्यानुसार १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये विविध राज्यांमध्ये शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्यावर बंदी अथवा निर्बंध आले. काळाच्या ओघात या नियंत्रण चौकटीमुळे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. भाडय़ाने जमीन कसण्यासाठी देण्यावर कायद्याने बंदी असल्याने आज अनेक राज्यांमध्ये जमीन अनौपचारिक पद्धतीने भाडय़ाने दिली जाते. अशा प्रकारे जमीन कसणाऱ्याला पीक कर्ज किंवा गुंतवणुकीसाठी कर्ज आणि विविध सरकारी योजनांचे लाभ मिळत नाहीत. कायद्यात अनेक जाचक तरतुदी असल्याने अनेक ठिकाणी स्वत:च्या जमिनीला भाडय़ाने घेतलेल्या जमिनीची जोड देऊन शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे हेही अल्पभूधारक कुटुंबांसाठी जिकिरीचे बनले आहे. अशा अडचणींमुळे बदलत्या काळानुसार या कायद्यामध्ये जमीन मालक आणि भाडेकरी शेतकरी या दोन्ही बाजूंचे हित जपण्यासाठी योग्य बदल करणे अनिवार्य झाले आहे. २०१६ साली नीती आयोगाने यासंदर्भात आदर्श कायद्याचा मसुदा (मॉडेल अ‍ॅग्रिकल्चर लॅण्ड लीजिंग अ‍ॅक्ट) तयार केला. त्यावर चर्चा होऊन कायदा संमत होणे महत्त्वाचे ठरले असते. ही चर्चा घडवून आणण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घेणे उचित ठरेल. दुसरी नियंत्रण चौकट म्हणजे शेतमालाच्या विक्रीसंदर्भातील कायदे. साठीच्या दशकात शेतमालाच्या विपणन व्यवस्थेसाठी नियंत्रित बाजाराची कल्पना पुढे आली. या संकल्पनेनुसार प्रत्येक राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आल्या. या समित्यांच्या अखत्यारीतील मार्केट यार्डमध्ये शेतमाल विकणे शेतकऱ्याला बंधनकारक झाले. गरीब, अशिक्षित, अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेतमाल विकताना किमतीमध्ये आणि वजनामध्ये व्यापाऱ्यांकडून/ ग्राहकांकडून फसवणूक होऊ नये ही त्यामागची भूमिका होती आणि सरकारी नियंत्रण असलेल्या मार्केट यार्डात परवानाधारक व्यापारी, आडतदारांना व लिलाव पद्धतीने शेतमाल विकणे बंधनकारक करून शेतकऱ्याला संरक्षण पुरवण्यात आले. कालांतराने या समित्यांत व्यापारी आणि आडतदारांचे वर्चस्व निर्माण झाले, राजकारण सुरू झाले. बहुतांश समित्या उत्पन्न वापरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आणि आधुनिक होण्यात कमी पडल्या. अशा परिस्थितीत एकीकडे शेतमालाला फायदेशीर किंमत मिळणे आणि मार्केट यार्डच्या सेवासुविधा मिळणे शेतकऱ्यांसाठी दुरापास्त ठरत गेले तर दुसरीकडे शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्येच विकण्याचे आणि सेवा शुल्क भरण्याचे बंधन शेतकऱ्यावर होतेच. म्हणजेच शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार. या व्यवस्थेत बदल करण्याची निकड आज जाणवू लागली आहे. शेतमालाच्या विक्रीसाठी केवळ सरकारी संस्थांवर अवलंबून राहण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीमध्ये खासगी क्षेत्र शेतकऱ्यांना विक्रीसाठी खुले करून जिथे चांगला भाव मिळेल तिथे- देशांतर्गत आणि देशाबाहेरही – विक्री करण्याचे स्वातंत्र्य असणे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे याची नितांत गरज निर्माण झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून चर्चा सुरू असलेल्या आणि २०२० साली केंद्रीय पातळीवर संमत झालेल्या आणि नंतर मागे घेतलेल्या शेती कायद्यांचा हेतू शेतमालाच्या विपणनात सुधारणा घडवून शेतकऱ्याला विक्री स्वातंत्र्य देणे हा होता. या कायद्यातील सुधारणांमुळे शेतमाल खरेदी-विक्रीसाठी अधिक संधी आणि स्वातंत्र्य मिळून शेती क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढू शकेल असे अनेक अर्थतज्ज्ञांना वाटत आहे. आज शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे, शीतगृहे, शेतमाल वाहून नेण्यासाठी योग्य तापमान असलेली वाहने व इतर अनेक सुविधा यांत मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे. शेतमालाच्या मागणीचे स्वरूप आता बदलले आहे. उंचावलेले जीवनमान, शहरीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे लोक केवळ गहू-तांदूळ-डाळींचा आहार घेण्यापेक्षा फळे, भाज्या, प्राणीजन्य पदार्थ, विविध पद्धतींनी प्रक्रिया केलेले पदार्थ खात आहेत. काळाच्या ओघात या कायद्यांवर प्रत्येक राज्यात समग्र चर्चा होऊन सुधारणांच्या दिशेने प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे. शेतीची पुढची वाटचाल थोडक्यात, पारंपरिक पद्धतीने अनुदाने देऊन आणि हमी भावाचे धोरण राबवून शेतकऱ्याचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी संरक्षण मिळतेच. परंतु याशिवाय भविष्यातील प्रगतीसाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुयोग्य आणि कालानुरूप कायदे करून मूलभूत सुधारणा घडवून आणणे याला पर्याय नाही. तसेच या चौकटीतून अनिर्बंध खासगी व्यापार आणि सरकारी एकाधिकारशाही या दोन्ही टोकाच्या विचारधारांना बाजूला ठेवून व्यावहारिकदृष्टय़ा अर्थपूर्ण अशी शेती उत्पादने आणि व्यापाराची प्रतिरूपे उदयास येणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी विशेषत: अल्प भूधारक शेतकऱ्यांनी निविष्ठा (इनपुट) खरेदी कमी दरात आणि उत्पादनाची विक्री जास्तीत जास्त दरात व्हावी म्हणून औपचारिक/ अनौपचारिक (शेतकरी उत्पादक कंपनी अथवा संस्था) पद्धतीने एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचे महत्त्व अर्थतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या पातळीवर ओळखले गेले आहे. शेतीसंबंधित खासगी अथवा सरकारी संस्थांकडून शेतकऱ्याला उत्तम सेवा मिळणे आवश्यक आहे. तसेच या संस्थांद्वारे शेतकरी कुटुंबाला प्रशिक्षण आणि कौशल्य विकास याद्वारे उद्यमशील बनवणे, दर्जेदार शेतमालाचा पुरवठा होण्यासाठी प्रोत्साहन देणे, शेतमालासाठी जिथे देशांतर्गत आणि देशाबाहेर मागणी तिथे पुरवठा करण्यासाठी योग्य बाजार आणि बाजारभाव मिळवून देणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याकडून अंतिम ग्राहकापर्यंत शेतमाल पोहोचण्यासाठी पुरवठा साखळी मजबूत करणे आणि मालाच्या किमतीमध्ये कसणाऱ्याचा हिस्सा वाढवण्यासाठी आणि दलालांचा कमी करण्यासाठी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. शेतीमालाच्या बाजारासंबंधी शेतकऱ्यांना सर्वंकष माहिती पुरवणे,जमिनीच्या माती परीक्षणापासून ते शेतकरी प्रशिक्षण आणि पिकाच्या विक्रीपर्यंत विविध बाबींसाठी नवे तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची आणि या माध्यमांद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योग आणि विविध प्रकारच्या शेती कंपन्या, स्टार्टअप्स आणि लघु कंपन्यांना आणि शेतीबाहेरील रोजगारनिर्मितीला पाठबळ देऊन त्याद्वारे शेतीवरील रोजगारनिर्मितीचा भार कमी करून अर्थव्यवस्थेचा हा कणा बळकट करणे पुढील वाटचालीसाठी श्रेयस्कर ठरेल

    Impact of the spillover of us quantitative easing on Indian Financial Markets: an empirical analysis (The)

    No full text

    Barriers to Entrepreneurship in Current Indian Environment (The)

    No full text
    ‘The Barriers to Entrepreneurship in Current Indian Environment’ Talk by Ms. Rashmi Bansal (Writer and Entrepreneur) on Monday, August 8, 2022 4.00 pm at Seminar Hall, Gokhale Institute of Politics and Economics (GIPE), Pune (India

    Agricultural Development Natural Resource Management (Book Review).

    No full text

    गाडगीळ ग्रंथालयातील साहित्य संपदेचे डिजिटायझेशन

    No full text
    गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ऐतिहासिक धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयातील तीस हजार जुन्या व दुर्मीळ साहित्यसंपदेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ऐतिहासिक धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयातील तीस हजार जुन्या व दुर्मीळ साहित्यसंपदेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. त्यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासूनचे वार्षिक अहवाल, प्रबंध, शोधनिबंध, प्रकाशनांसह ब्रिटिशांनी १८७२ मध्ये केलेल्या देशाच्या पहिल्या जनगणनेपासून १९५१पर्यंतच्या जनगणनेचे अहवाल, विदर्भातील पहिले वृत्तपत्र 'वऱ्हाड समाचार'चे १८६८ पासूनचे अंक, 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' नियतकालिकाचे १९६१ पासूनचे अंक आदी साहित्यठेवा पीडीएफ स्वरूपात डिजिटली उपलब्ध करण्यात आला आहे. ग्रंथालयाच्या https://dspace.gipe.ac.in या संकेतस्थळावरून हा साहित्य खजिना संशोधक आणि साहित्यप्रेमींना मोफत डाउनलोड करून वाचता येत आहे. दररोज पंधराशेहून अधिक वाचक त्याचा लाभ घेत असून, पन्नासहून अधिक देशांतील वाचकांनी या डिजिटल ग्रंथालयाला ऑनलाइन भेट दिली आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा. नानाजी शेवाळे यांनी दिली. 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी'चे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांनी सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले. गोखले संस्थेची १९३०मध्ये स्थापना झाल्यावर, संस्थेने शैक्षणिक व संशोधनात्मक कामांसाठी या ग्रंथालयाचा उपयोग सुरू केला. त्याचबरोबर त्याचे सार्वजनिक स्वरूपही जपले आहे. पदवीधारक नागरिकांना या ग्रंथालयाचे सभासद होता येते. या ग्रंथालयात सध्या दोन लाख ८४ हजार पुस्तके आहेत. त्यापैकी अनेक पुस्तके दुर्मीळ आहेत. त्यात नामदार गोखले यांच्या संदर्भातील समग्र साहित्य, जुन्या जनगणनांची कागदपत्रे, गोखले संस्थेचे वार्षिक अहवाल, संशोधन अभ्यास, विविध आयोग आणि समित्यांचे अहवाल, 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे संस्थापक वामन गोविंद काळे आणि निबंधकार श्रीपाद वामन काळे यांचे 'अर्थ' या नियतकालिकांचे जुने अंक, १९३७पासूनची आर. एम. काळे स्मृती व्याख्याने अशा विपुल साहित्याचा समावेश आहे. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी विविध संदर्भ शोधण्यासाठी आवर्जून या ग्रंथालयात येतात. यापैकी अनेक पुस्तकांची पाने जीर्ण होऊ लागली आहेत. त्यामुळे या दुर्मीळ साहित्य ठेव्याचे जतन करण्यासाठी ग्रंथालयाने डिजिटायझेशन सुरू केले आहे. याशिवाय विनायक पुरोहित यांचे समग्र साहित्य, वऱ्हाड समाचार, 'माणूस'चे ऐतिहासिक अंकही डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. दर वर्षी ग्रंथालयातील तीन हजार पुस्तके पीडीएफ स्वरूपात रूपांतरित केली जात असून, आगामी काळात 'कॉपीराइट'मुक्त असलेली साठ हजार पुस्तके डिजिटाइज केली जाणार आहेत, असेही शेवाळे यांनी सांगितले. धनंजयराव गाडगीळ ग्रंथालय देशातील जुने व विशेष ग्रंथालय आहे. सध्याच्या डिजिटल युगात हे ग्रंथालय डिजिटली अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. ग्रंथालयातील दुर्मीळ पुस्तकांचा फायदा अधिकाधिक विद्यार्थी, संशोधकांना व्हावा, यासाठी त्यांचे डिजिटायझेशन केले जात आहे. त्याला जगभरातील वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात विविध संशोधन साहित्य-नियतकालिके, तज्ज्ञांची दृकश्राव्य स्वरूपातील व्याख्याने, पॉडकास्टही ग्रंथालयाच्या माध्यमातून डिजिटली उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. - डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले संस्थ

    Remittances Matter: Understanding from Four States of India

    No full text

    No full text

    0

    full texts

    33,335

    metadata records
    Updated in last 30 days.
    DSpace@GIPE
    Access Repository Dashboard
    Do you manage Open Research Online? Become a CORE Member to access insider analytics, issue reports and manage access to outputs from your repository in the CORE Repository Dashboard! 👇